Share

“राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न” – खासदार सुजय विखे पाटील

Published On: 

औरंगाबाद : भाजपाचे खासदार सुजय विखे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सुजय विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रयत्न कोल्हापूरच्या संकल्प सभेतून दिसून आला आहे. असा आरोप अहमदनगरचे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी विजेच्या प्रश्नावर त्रस्त झाले आहेत, असे सुजय विखे म्हणाले.

विविध वाहिन्यांवर विविध गोष्टी पाहून राज्यात काय चाललंय हे पाहण्यास मिळत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असताना तिन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आपल्यात गुंग असल्याची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी विचार विनिमय करण्याची गरज आज निर्माण झाली आहे असा आरोप खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात वादावादी सुरु असल्याचे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे महाविकासआघाडीत धुसफूस सुरु असल्याचे, बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!