Share

आदित्य ठाकरे, देसाई यांचा उल्लेख ‘ऑदर लीडर्स’, फडणवीसांचं ट्विट चर्चेत

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठीच काल मोदी पुण्यात दाखल झाले होते. आत या कार्यक्रमाच्या भोवती अनेक वाद विवाद होत आहेत. या कार्यक्रमावरुन जोरात राजकारण रंगले आहे. निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री यांचं नाव नसल्याच्या कारणावरून सूरू झालेल्या वादापासून ते मोदींच्या स्वागतापर्यंतच्या घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने, कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोदींच्या स्वागताला ही गेले नाहीत. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने हा कोतेपणा आहे, असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते. यावर आता भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी एक खोचक ट्विट केले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं एक ट्विट शेअर करत महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या ट्विटमध्ये मोदींचं स्वागत करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि ‘इतर नेते’ उपस्थित होते असा उल्लेख केला आहे. इतर नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई होते. त्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्विट शेअर करत टोलेबाजी केली आहे. ‘समजदार को इशारा काफी आहे,’ असे भातखळकर म्हणाले.

हा पुरस्कार सोहळा पार पडल्यापासून पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यामुळे अनेक नेते टीका करत आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी हा मनाचा कोतेपणा आहे, असे म्हंटल आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी मराठी माणसाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!