Share

IPL 2022 PBKS vs CSK : वानखेडेवर चेन्नईनं जिंकला टॉस; पंजाबच्या संघात तीन बदल!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात स्पर्धेचा ३८वा सामना खेळला जात आहे. चालू मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. पंजाब किंग्जने आतापर्यंत सातपैकी तीन सामने जिंकले असून सहा गुणांसह ते आठव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने सातपैकी फक्त दोन सामने जिंकले असून चार गुणांसह ते नवव्या स्थानावर आहे. वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्जच्या प्रमुख खेळाडूंची कामगिरी खराब राहिली असून त्याचा फटका संघाला सहन करावा लागला आहे. या मोसमात कर्णधार मयंक अग्रवालची फलंदाजी सरासरी आहे आणि त्याला फक्त एक अर्धशतक करता आले आहे. याशिवाय जॉनी बेअरस्टो आणि शाहरुख खानसारखे खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. शिखर धवननेही काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग यांनी किफायतशीर गोलंदाजी केली असली तरी त्यांना विरोधी फलंदाजांना बाद करता आले नाही.

चेन्नई सुपर किंग्जसाठी फलंदाजीही अडचणीची ठरली असून या संघाचे फलंदाजही सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. मधल्या फळीत शिवम दुबे आणि महेंद्रसिंह धोनी यांनी फिनिशरच्या रूपात खूप चांगले योगदान दिले आहे. ड्वेन ब्राव्होने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली असून महीश तिक्षणाने त्याला पूर्ण साथ दिली आहे. मागील सामन्यात मुकेश चौधरीने नव्या चेंडूने केलेल्या गोलंदाजीमुळे संघाला नक्कीच आत्मविश्वास मिळाला असेल. कर्णधार रवींद्र जडेजाने अष्टपैलू म्हणून आतापर्यंत निराशा केली असून त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महीश तिक्षणा.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!