Share

कॉंग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

अशातच कॉंग्रेसला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी कृपाशंकर सिंग यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण पाहता कृपाशंकर सिंग लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कृपाशंकर सिंग यांनी कलम ३७० विषयी भाष्य करताना कॉंग्रेसच्या भूमिकेला विरोध दर्शवत भाजपला पाठींबा दिला होता. तेव्हापासूनच त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तसेच त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचीही भेट घेतली होती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधून आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात अब्दुल सत्तार, भाऊसाहेब कांबळे, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा समावेश होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!