Share

‘सरकार किती वेळा खोट बोलणार ? शेवटी मंदीचं वास्तव समोर आलचं’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेवरून आणि खरेदी केलेल्या माध्यमांवरून मोदी सरकारला लक्ष केले आहे. देशात सध्या मंदीची लाट आहे. याबाबतचे वास्तव सगळ्यांना ठाऊक आहे. कोणतंही खोटं शंभर वेळा सांगितले तरी ते सत्य होत नाही. त्यामुळे ऐतिहासिक मंदी आली आहे, हे केंद्र सरकारला हे मान्य करावं लागेल, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

रविवारी प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका करताना अच्छे दिनचा भोंगा वाजविणाऱ्या भाजपाने अर्थव्यवस्थेची हाल बिघडवून टाकले आहे, अशी टीका केली. जीडीपी ही घटला आहे. देशातील लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थव्यवस्था नष्ट करण्यामागे कोण जबाबदार आहे? असा उपप्रश्न त्यांनी सरकारला विचारला. तर खरेदी केलेल्या चानेलच्या माध्यमातून सरकार खोट्या हेडलाईन्स करून जनतेला विचलित करीत आहे. त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाईन मॅनेजमेंट करून काम करणार? असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.

प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना देखील लक्ष्य केले होते. , देशात मंदी आहे की नाही हे सरकार स्वीकारणार आहे का? अर्थमंत्र्यांनी राजकारणाशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेचं सत्य देशातील जनतेला सांगायला हवं. जर हेच सत्य अर्थमंत्री स्वीकारायला तयार नसतील तर सर्वात मोठी समस्येचं निरसन कस करणार, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली होती.

दरम्यान जागतिक मंदीमुळे देशातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम बेरोजगारीवरही होत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढतचं आहे. त्यात आता मंदीमुळे नोकऱ्या जात असल्याने बेरोजगारांच्या संख्येत नव्याने भर पडत आहे. तसेच ऑटो इंडस्ट्रीने मान टाकली आहे. तर वस्त्रोद्योग देखील डबघाईला आला आहे. अशी विदारक परिस्थिती असताना सरकार खोट्या हेद्लाइन्स जनतेला विचलित करीत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!