Share

‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलेच आरोप – प्रत्यारोप होत आहेत. सोलापूरच्या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केल असा सवाल केला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना चांगलेच लक्ष्य केले आहे. आज शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही अमित शहांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले आहे.

‘गरज पडेल तेव्हा शरद पवारांचा सल्ला घेयला येता आणि नंतर शरद पवारांवरचं टीका करता असे’, म्हणत रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत विकासाचं राजकारण केल आहे. शिक्षण, क्रीडा , सहकार, कृषी, संरक्षण या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम केल आहे. मात्र ते भाजप नेत्यांना दिसत नाही. त्यामुळे भाषणांमधून व्यक्तिगत टीका केली जाते. जर ते विकासावर बोलायला लागले तर बोलायलाचं काही येणार नाही. त्यामुळे एखाद्या बड्या नेत्याला लक्ष्य करून भाषण केली जातात, असे रोहित पवार म्हणाले.

तसेच भाजप नेते गरज पडेल तेव्हा शरद पवारांची मदत घेतात. पण निवडणुकांमध्ये पवारांवर टीका करतात. मात्र ही भाजपची रणनीती आहे. आधी एखाद्या नेत्याचे गुणगान गायचे आणि त्यानंतर त्याच्या विरोधात टीका करायची. जनतेचे लक्ष विचलित करायचे. मात्र जनता ही सुज्ञ आहे. आता जरी नेते पक्ष सोडून जात असले तरी कार्यकर्ते मात्र खंबीर आहेत. या कार्यकर्त्यांच्या जीवावरचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा उभी राहणार आहे, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणात आहेत. कर्जत – जामखेड या विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे आपल्या प्रत्यक्ष राजकारणाला सुरवात करणार असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीने रोहित पवार यांनी मतदारसंघातील जनतेशी नाळ देखील जोडली आहे. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन जनतेची मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!