Share

Kailash Vijayvargiya | “परदेशातल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलतात”; त्या वक्तव्यावर कैलाश विजयवर्गीय यांचे स्पष्टिकरण

Published On: 

🕒 1 min read

पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी खोचक टीका केली होती. विजयवर्गी यांनी नितीश कुमार यांची तुलना बॉयफ्रेंड बदलणाऱ्या महिलांसोबत केली होती. परंतू त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर विजयवर्गीय यांचा व्हिडिओ शेअर करत व्हिडिओला ‘महिलांचा आदर दाखवणारे भाजप सरचिटणीसांचं उदाहरण’, असं कॅप्शनही दिलं. अशातच यावर कैलाश विजयवर्गी यांनी केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महिला आमच्यासाठी पवित्र आहेत-

मी नारी शक्तीचा सन्मान करतो. हे वादग्रस्त वक्तव्य माझं नाही, ते माझ्या एका विदेशी मित्राचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी काल म्हणजेच शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टिकरण दिलं आहे. त्याचबरोबर जिथे महिला शक्तीचा प्रश्न येतो, महिला आमच्यासाठी पवित्र आहेत, त्यामुळे आम्ही सर्व भारतीय स्त्रियांचा आदर करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

जर कोणतीही व्यक्ती मी केलेल्या वक्तव्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल किंवा माझं सगळं विधान जाणून घेतल्यानंतरही त्यावर सवाल उपस्थित करत असेल. तर याचा अर्थ ती व्यक्ती अज्ञानी असल्याचं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते कैलाश विजयवर्गीय?

जेव्हा मी काही दिवस परदेशात होतो, तेव्हा इथल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. अगदी त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्रीही तसेच असून कोणाचा हात धरतात तर कोणाचा हात सोडतात हेच कळत नाही, असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!