🕒 1 min read
Delhi । दिल्ली : काल सकाळीच सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. कालपासून सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली होती. तर गेले १४ तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपासणी आणि शोधाशोध करत आहे.
तर दुसरीकडे छाप्याच्या काही तासांनंतर शुक्रवारी १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दिल्ली सरकारच्या सेवा विभागाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार, ज्यांची बदली करण्यात आली आहे त्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव उदित प्रकाश राय यांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये एका कार्यकारी अभियंत्याला अन्यायकारकरित्या फायदा मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून दिल्लीच्या उप-राज्यपालांनी राय यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती.
या आदेशानुसार, राय यांची प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. खरेतर, दिल्ली सरकारने गेल्या वर्षी मद्य व्यवसायात सुधारणा करण्याच्या उद्देशाने महसूल वाढवण्यात आल्याने उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ च्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले.
दरम्यान, 14 तासांच्या छाप्यानंतर मनिष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छाप्यानंतर मनीष सिसोदिया यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सीबीआयचा गैरवापर करत आरोप केला. सीबीआयच्या पथकाने माझा लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिसोदिया म्हणाले की, सीबीआयवर वरून नियंत्रण ठेवले जात असून या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेले चांगले काम थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Manish Sisodia । “भ्रष्टाचार केलेला नाही, त्यामुळे…”; 14 तासांच्या तपासणीनंतर मनीष सिसोदियांची मोठी प्रतिक्रिया
- Uddhav Thackrey | “सरकारने निष्पाप जीवांचा बळी घेतला, फडणवीस आता…”, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
- Uday Samant । हल्ला झाला त्याच ठिकणी घेणार सभा, दम असेल तर धक्का लावा; सामंतांचे शिवसेनेला आव्हान
- Mumbai | 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा करणार; मुंबई पोलीस यांना धमकीचा मेसेज
- BJP । “कंबोज यांचा रोख हा अजित पवारांकडे नसून तो राष्ट्रवादीचा…”; निंबाळकरांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
