मुंबई : बिहारमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर देशपातळीवर भाजप विरोधी मुख्य आघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर देशहितासाठी भाजप विरोधात सर्व पक्षांची एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगत नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील आपण भेट घेणार असल्याचे सांगितले. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांना 150 देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, भाजपशी काडीमोड घेत एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर नितीशकुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱयावर असलेले नितीश कुमार विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नितीश कुमार यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यांच्या विकासाबाबत चर्चा झाली. त्यांनी आमच्या कामाला पाठिंबा दिला आहे. देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याबरोबर लढण्याबाबत चर्चा झाल्याचे नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधतान सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Shahaji Bapu Patil । शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला ‘त्या’ निवडणुकीचा किस्सा
- Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा रत्नागिरीसाठी रवाना…
- यंदा कर्तव्य आहे! अथिया शेट्टी आणि के एल राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात
- Eknath Shinde meet Nana Patekar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाना पाटेकर यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

