पाटणा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. विरोधी पक्षातून एक नाही तर अनेक चेहरे समोर येत आहेत, ज्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे आहे. नितीश कुमार यांनी भाजपला पुन्हा एकदा नमवले आहे, त्यामुळे बिहारमधील लोकसभा निवडणूक भाजपसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. भाजपने बिहार राज्याची जबाबगारी विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.
विनोद तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी-
भाजप हायकमांडने लोकसभा निवडणुकीत संघटनकौशल्य संपन्न समजले जाणारे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे बिहारशी चांगले संबंध आहेत. अशा स्थितीत प्रभारींची यादी जाहीर झाल्यावर त्यांनी बिहार राज्याचे प्रभारी म्हणून मुंबईतील गिरगावचे विनोद तावडे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
नितीश कुमार मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यात व्यस्त-
नितीश कुमार सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यात व्यस्त आहेत. नितीश यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपने आपला विश्वासू चेहरा मैदानात उतरवला आहे. विनोद तावडे संघाच्या मैदानातून येतात. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिले असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यासोबतच आमदार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीही होते.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र
- Kishori Pednekar | पेडणेकरांचा गौप्यस्फोट! फडणवीस, चंदक्रांत पाटील आणि राज्यपालांचे रऊफ मेमनसोबत फोटो केले पोस्ट
- Women Blames Police | रक्षक बनले भक्षक! “मी सुंदर असल्याने मला अटक करुन पोलिसांनी…”, महिलेचा धक्कादायक आरोप
- Kishori Pednekar | “मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही” ; भाजपच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार
- Aurangabad Police | औरंगाबाद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! ‘असा’ घेतला बिंधास्त काव्याचा शोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

