🕒 1 min read
Uday Samant । मुंबई : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातयांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाते नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात होते. यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला होता. पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला होता. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न होता. यानंतर आता याबाबत पुन्हा एकदा उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
काल दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला. शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करीत काचा फोडल्या होत्या. मात्र, हे सर्व आपल्या मनात आहे. त्यामुळे आगामी 15 दिवसांमध्ये आपण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे सामंत यांच्या घोषणेनेनंतर त्यांचं पुढचं पाऊल काय असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेमकं त्यावेळी काय झालं होत ?
महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पडले आणि त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले होते. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही शिंदे गटावर नाराज होते. पुण्यातील शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत हे आले असताना यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडल्याने शिंदे गटाच्या आमदारांवर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai | 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा करणार; मुंबई पोलीस यांना धमकीचा मेसेज
- BJP । “कंबोज यांचा रोख हा अजित पवारांकडे नसून तो राष्ट्रवादीचा…”; निंबाळकरांचा गौप्यस्फोट
- Dhananjay Mahadik | “आता राजकरणात महाभारत होणार…”, धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांना आव्हान
- Anil Parab । ५० थरांची दहीहंडी फोडायला बहुदा ते स्पेनला गेले असतील; अनिल परबांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
- Eknath Shinde | बस झालं मर्यादा… आता गणेशत्सव जोरदार साजरा करायचा – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
