Share

Nitish Kumar | “आमचे नाते खूप जुने…”: लालू यादव यांच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

Bihar | पटना : गेल्या आठवड्यात बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. यामध्ये जदयूने भाजपशी युती तोडली. नितीशकुमार यांनी राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जेडीयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. नव्या सरकारला १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सावध भूमिका घेत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर १० ऑगस्टला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आहे. महाआघाडीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, हम आणि डावे पक्ष आहेत. यानंतर आज राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव बुधवारी दिल्लीहून पाटणा येथे पोहोचले.

विमानतळ ते राबडी देवी यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारही पोहोचले होते. यादरम्यान नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्यात चर्चा झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले कि, आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि आमचे नाते खूप जुने आहे, असं ते यावेळी म्हणाले. लालू यादव यांच्या भेटीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!