Share

स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पद भरती मध्ये ‘इतक्या’ पदांची झाली वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 11 मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावेळी 161 पदांचा समावेश होता. जाहिरातीमध्ये केवळ 161 पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थी कडून नाराजगी व्यक्त करण्यात आली होती. यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरती संख्येत वाढ केली आहे.

 स्पर्धा परिक्षा पद भरतीच्या संख्येत वाढ –

यावर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक या पदांच्या संख्यात वाढ करण्यात आली असून आता एकूण 501 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गट अ आणि गट ब सर्व वर्गांची मिळून 340 पदे वाढल्याने 501 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे.

पदभरतीची संख्या वाढल्याने आनंद –

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी शहरात येऊन राहतात. या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त पुण्यामध्ये दिसून येते. मात्र मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला. अशातच आता पदभरतीची संख्या वाढल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

उद्या होणार परिक्षा –

3 हजार 457 विद्यार्थांची परीक्षा ती उद्या परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अकोला जिल्ह्यामध्ये होणार आहे. अकोल्यातील एकूण 12 उपकेंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार असून सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा शांत सुरक्षित आणि व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!