Share

Manish Sisodia । “भ्रष्टाचार केलेला नाही, त्यामुळे…”; 14 तासांच्या तपासणीनंतर मनीष सिसोदियांची मोठी प्रतिक्रिया

Published On: 

Manish Sisodia । दिल्ली : सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. काल सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली होती. तर गेले १४ तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपासणी आणि शोधाशोध करत आहे. वृत्तानुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सिसोदिया आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

14 तासांच्या छाप्यानंतर सीबीआयचे अधिकारी तेथून बाहेर आले. त्याच्या घराची आणि वाहनांची झडती घेण्यात आली. अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेला माल सीबीआयकडे नेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांना सध्या अटक होणार नाही. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह १६ जणांना आरोपी करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.

यानंतर आता यावर मनिष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छाप्यानंतर मनीष सिसोदिया यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सीबीआयचा गैरवापर करत आरोप केला. सीबीआयच्या पथकाने माझा लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिसोदिया म्हणाले की, सीबीआयवर वरून नियंत्रण ठेवले जात असून या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेले चांगले काम थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच यानंतर पुढे सिसोदिया म्हणाले की, सकाळी सीबीआयची टीम आली होती, त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. माझा कम्प्युटर आणि पर्सनल मोबाईल जप्त करून घेऊन गेला आहे. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे, पुढे अधिक तपास झाल्यास सहकार्य करू. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, भ्रष्टाचार केलेला नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!