मुंबई: खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या मोठ्याप्रमाणावर चर्चेत आहे. ‘मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे’, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. तर यावरूनच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खासदार अमोल कोळे यांच्यावर टीका केली आहे.
भविष्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, या भौतिक प्रश्नात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रस नाही. आताच्या घडीला महापूर अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली आहे, मग आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.
भविष्यामध्ये #मुख्यमंत्री कोण होणार,
या भौतिक प्रश्नात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रस नाही.आताच्या घडीला महापूर अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली आहे, मग आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?@kolhe_amol @abpmajhatv pic.twitter.com/A93zG3fSyh
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 3, 2021
दरम्यान पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती


