Share

‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती

Published On: 

नाशिक : नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच गेल्या महिन्यातच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केले आहे. वरच्या बाजूच्या भाम, भावली, वाकी व मुकणे या मराठवाड्यासाठी असलेल्या धरणांतील पाणी पिण्याच्या नावाखाली तिकडे शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या धरणांच्या पाण्याचे नियंत्रण मराठवाड्यातील वैजापूर पाटबंधारे कार्यालयाकडे देण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी भूमिका मंत्री कराड यांनी मांडली.

त्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडा असा एकत्रित संबंध असलेली जलसंपदा कार्यालये नाशिक येथून औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, यावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. जलसंपदाचे कोणतेचं कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही असे के नाशिकमध्ये म्हणालेत.

‘गुजरातकडे जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे बहुतांश प्रकल्पांचे कामकाज नाशिकमधून चालणार असल्याने जलसंपदा विभागाचे कुठलेच कार्यालय नाशिकच्या बाहेर हलविण्याचा शासनाच्या विचाराधीन नाही अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आज शनिवारी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा योजनाच्या आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

गुजरातकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला वळविण्याच्या अनेक योजनांवर शासनस्तरावर काम सुरु आहे. गुजरातला जाणारे महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे याला राज्य शासनाचे आगामी काळात प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी विविध प्रकल्प डिसेंबरपासून गतीने सुरु होतील. महत्त्वाच्या दमणगंगा एकदरे गोदावरी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) डिसेंबरपर्यत पूर्ण होईल. याशिवाय इतरही अनेक कामे गतीने सुरु होतील. ही सगळे कामे नाशिक जिल्ह्यात होणार असल्याने जलसंपदा विभागाची कुठलीही कार्यालये नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नेवून चालणार नाही अशी स्पष्टोक्ती पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!