🕒 1 min read
अहमदनगर : आज नगर येथे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तिघेही एकाच मंचावर उपस्थित आहेत. यावेळी गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाचे स्वागत करत त्याविषयी भाष्य केले आहे. शिर्डी विमानतळ परिसरात स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला आहे.
यावेळी ठाकरेंचे कौतुक करत गडकरी म्हणाले की,’मी काल परवा वर्तमानपत्रात वाचल की माननीय उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील विमानतळाच्या परिसरात स्मार्ट सिटी वसवण्याचा निर्णय घेतला. फार चांगला निर्णय आहे. त्यामुळे आपल्याला आता रोड बनला, एअरपोर्ट बनला की मी दिल्लीत बघतो की पहिले पुढारी येतात आणि म्हणतात की अलाईन्मेंट दाखवा, कुठून रोड चाललाय. मी म्हणतो कशासाठी. म्हणतात जागा घेऊन ठेवतो आम्ही. त्यामुळे आता पुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी सरकारनं जागा घेतली पाहिजे, असा माझा आग्रह आहे. त्या जागेवर तुम्ही डेव्हलपमेंट करा. स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करा. यासाठी मी पूर्ण मदत करेल. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल’ असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, २९ सप्टें. रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरेंनी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर बसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे, अशी सूचना दिली. तसेच एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण विकास करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुरक्षित वातावरणात शिक्षण देणं ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची सामुहिक जबाबदारी’
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
