Share

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेवर टीका केली. ‘नागरिकांना तुम्ही मदतीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करीत त्यांनी पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले’ असे वक्तव्य पंकजांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंनी पंकजांच्या टीकेवर टोलेबाजी केली आहे.

मुंबईमध्ये यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, ‘त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात ११ वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले’ असे ते म्हणाले.

नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना पंकजा मुंडे अचानकपणे आजारी पडल्या आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दोन ते चार दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात कोणता फोन कॉल घेऊन शकत नाही तसेच कोणाला भेटू शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी काल केलेल्या आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते करत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. मात्र, फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!