🕒 1 min read
मुंबई : तीन महिन्यांपूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर सदाभाऊ खोत गेले होते. यावेळी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण करून बिल दिला नसल्याचा आरोप हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी केला होता. अशोक शिनगारे प्रचंड आक्रमक झाले होते. एवढेच नाही तर कार्यकर्ते जेवण करून गेल्याने बिल कोण देणार? असा सवाल देखील त्यांनी सदाभाऊ खोत यांना केला होता. हाच हॉटेल मालक आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अशोक शिनगारे यांना अटकः
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे अण्णा पाटील हायस्कूल जवळ एका वाहनातून अवैद्य वाळू टाकली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली होती. यावरून वाहतूक व वाळू उपसा परवाना आहे का याची चौकशी केली गेली. तेव्हा सांगोला येथून अवैद्य वाळू उपसा करून तिरंगी येथे आणल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी वाहन व वाहन चालक अशोक शिनगारे व तुषार सलगरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर केले होते आरोपः
तीन महिन्यांपूर्वी भर रस्त्यामध्ये हॉटेलच्या बिलावरून अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांची अडवणूक करून मोठा राडा घातला होता. त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनी अशोक शिनगारे वाळू चोर असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी शिनगारे यांनी खोत यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते असं म्हणत असल्याची चर्चा होती. अशातच शिनगारे हे खरोखरच चोर असल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्यः
- Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! न्यायालयीन कोठडी मुक्काम वाढला
- Umesh Kolhe Case : गुन्हेगाराचा पत्ता सांगा, 2 लाखांचे बक्षीस मिळवा, उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी NIA ची घोषणा
- Whatsapp Calling | आता व्हॉट्सअँप कॉलिंगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
- VIDEO : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी नवी जर्सी सादर करणार BCCI
- Lumpi Virus| लम्पी व्हायरसमुळे राजस्थानमध्ये 50 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे व्हायरस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
