Share

फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालेत. अशा कठिण प्रसंगी राज्य सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षनेते करत आहेत. त्या अनुषंगाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केली आहे.

‘संकट भीषण. शेतकरी चिंतेत. त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी नको. आज वाशिम, हिंगोली, नांदेडचा दौरा करत असल्याची’ माहिती फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असण्याबरोबरच राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अशा पाहणी दौऱ्याच्यावेळी त्या-त्या भागातील प्रस्थापित नेतेही सोबत असतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत. आजारी असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी त्यांना चार दिवस बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे यांचे आजारपण यावरुन राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानही या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे यांचे आजारी पडणं यामुळं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!