मुंबई : मराठवाड्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेवर टीका केली. ‘नागरिकांना तुम्ही मदतीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा सवाल करीत त्यांनी पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले’ असे वक्तव्य पंकजांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंनी पंकजांच्या टीकेवर टोलेबाजी केली आहे.
मुंबईमध्ये यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, ‘त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात ११ वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले’ असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंच्या विदेशी दौऱ्यावर बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्या अगोदर पंकजा मुंडे यांनीही भेट दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्यात. परंतू धनंजय यांनी दुसऱ्याने काहीही केलेले नाही असे म्हणत आहेत हे चुकीचे आहे असे धस म्हणाले. तसेच आता पंचनामे करण्याची वेळ निघुन गेलेली आहे. सरकारने थेट शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणीही आ.धस यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुरक्षित वातावरणात शिक्षण देणं ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची सामुहिक जबाबदारी’
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला’


