मुंबई: निवडणूक ही एक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी, स्तर असावा. दुर्दैवाने भाजपने उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीला नळावरच्या भांडणाचे स्वरूप दिले आहे. हा प्रकार ना लोकशाहीला शोभणारा आहे, ना कोल्हापूरच्या संस्कृती व परंपरेला शोभणारा आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे.
माजी खा. धनंजय महाडिक यांनी महिलांच्या कार्यक्षमतेबाबत केलेले विधान निंदनीय आहे. कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी लष्कराची परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण करून पतीचे देशसेवेचे कार्य पुढेही सुरू ठेवले आहे. जिद्दीने प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. भाजपने संपूर्ण कोल्हापुरात ‘भाजप हेच उत्तर’ असे फलक लावले आहेत. पण प्रत्यक्षात भाजप जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर निरूत्तर आहे. कोल्हापुरात आज पेट्रोलचे भाव १२० वर का आहेत? डिझेलचे भाव १०३ वर का आहेत? एलपीजीचे सिलिंडर हजाराच्या घरात का आहे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.
लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी भाजपचा आटापिटा का सुरू आहे? देशात बेरोजगारीचे प्रमाण का वाढते आहे? सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान का खालावते आहे? चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार गप्प का आहे? या देशाच्या परराष्ट्र धोरणाचे तीन-तेरा का वाजले आहेत? क्षुल्लक राजकारणासाठी देशाचे सौहार्द धोक्यात का आणले जाते आहे? गल्ली-बोळातल्या निवडणुकीपासून विधानसभा अन् संसदेच्या प्रत्येक निवडणुकीत हिंदू-मुसलमान केल्याशिवाय तुमचा प्रचार पूर्ण का होत नाही? अशा असंख्य प्रश्नांवर भाजप निरूत्तर आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“काय उपयोग ५० वर्ष राजकारणात असून लोकं घरावर चप्पल…”, निलेश राणेंचा शरद पवारांना टोला
“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत…”, निलेश राणेंचा खोचक टोला
एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार- निलेश राणे
“कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अजित पवारांनी व्यक्त केली शंका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

