Share

IPL 2022: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गिल- लिविंगस्टोनची वरचढ; तर पर्पल कॅपसाठी पंजाबच्या खेळाडूची नव्याने एन्ट्री!

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना शुक्रवारी रात्री पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पाहायला मिळाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चालू मोसमातील साखळी टप्प्यातील १६व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने १८९ धावा फलकावर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना शुबमन आणि तेवतीयाच्या खेळीने गुजरातने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यातील सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. याआधी पंजाबकडून या वर्षी घातक फॉर्ममध्ये दिसलेल्या लियाम लिविंगस्टोन (liam livingstone) आयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावून मैदानात दहशत निर्माण केली. मात्र, त्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो ६४ धावांवर बाद झाला. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त्याला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी हे पुरेसे होते. तर गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने (Shubman gill) आपल्या उत्कृष्ट शैलीत फलंदाजी करत पंजाब किंग्जविरुद्ध ९६ धावा केल्या तो शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात आपल्या १ षटकाने सामन्यात उत्साह आणणारा गोलंदाज राहुल चहर (rahul chahar) सामन्यात १ बळी घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत ३ व्या क्रमांकावर आला आहे. चहरने आतापर्यंत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करत महागड्या विकेट घेतल्या आहेत. गुजरातविरुद्धच्या ४ षटकांमध्ये राहुलने इकॉनॉमी रेटने १० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या असतील. पण त्याने सामन्याच्या अत्यंत नाजूक वळणावर विकेट घेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले आणि आपल्या संघाला पुनरागमनाची संधी दिली.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!