🕒 1 min read
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या (sharad pawar) सिल्व्हर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनीही ट्वीट करत शरद पवारांना टोला लगावला आहे.
“काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा.”, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे. सोबतच त्यांनी आंदोलकांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
दरम्यान या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत…”, निलेश राणेंचा खोचक टोला
एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार- निलेश राणे
“कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अजित पवारांनी व्यक्त केली शंका
IPL 2022: कोच नेहराने सांगितला गुजरातच्या विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला ‘खाओ पीओ…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
