मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांना इशारा दिला आहे.
“आज परळ डेपो जवळ एक एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, याला जबाबदार कोण? शरद पवारांनी घराबाहेर येऊन एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न का केला नाही? सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी बसायला तयार आहे पण निघून गेल्या… एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार.”, असा इशारा निलेश राणे यांनी ट्वीट करत दिला आहे.
दरम्यान या घटनेनंतर अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? त्यांच्या भावना कुणी भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचे आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा तपास लागेल. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अजित पवारांनी व्यक्त केली शंका
IPL 2022: कोच नेहराने सांगितला गुजरातच्या विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला ‘खाओ पीओ…’
“…तर त्याला शरद पवार, वळसे पाटील जबाबदार”, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री यांचा गंभीर आरोप
“आता अशी माणसं दुर्मीळच झाली आहेत”, संजय राऊतांची प्रतापभाई आशर यांना श्रद्धांजली
IPL 2022: सर्वात रोमांचक सामन्यात बनले अनेक विक्रम; धवनने रचला इतिहास तर गिलने गाठला ‘हा’ टप्पा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

