Share

“अजित पवार इतके आक्रमक नेते की, काल मुंबईत…”, निलेश राणेंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: “अजित पवार महाराष्ट्राचे आक्रमक नेते समजले जातात. ते इतके आक्रमक आहेत की काल शरद पवारांच्या घरा बाहेर भानगड झाली तरी मुंबईत येण्याची त्यांच्यात हिंम्मत नव्हती.”, असा खोचक टोला भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यावरूनच अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान  या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर या घटनेनंतर अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? त्यांच्या भावना कुणी भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचे आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा तपास लागेल. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तर निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटले की, “आज परळ डेपो जवळ एक एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, याला जबाबदार कोण? शरद पवारांनी घराबाहेर येऊन एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न का केला नाही? सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी बसायला तयार आहे पण निघून गेल्या… एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार.” त्यामुळे या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मविआ सरकारने भाजपवर निशाणा साधत टीकास्त्र केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गिल- लिविंगस्टोनची वरचढ; तर पर्पल कॅपसाठी पंजाबच्या खेळाडूची नव्याने एन्ट्री!

एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार- निलेश राणे

“कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अजित पवारांनी व्यक्त केली शंका

IPL 2022: कोच नेहराने सांगितला गुजरातच्या विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला ‘खाओ पीओ…’

“…तर त्याला शरद पवार, वळसे पाटील जबाबदार”, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री यांचा गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!