Share

काल एवढं सांगूनही फडणवीस मास्क लावत नाहीत, नवाबभाई तर काय…- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भर सभागृहामध्ये मास्क न लावणाऱ्या नेत्या मंत्र्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. ‘काही लोक सोडली तर कोणीच इथे मास्क लावत नाहीत. आपण दोन्ही बाजूचे लोक 4-5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय सुरु आहे ते पाहत आहे. आम्हीच मास्क लावत नसू तर नागिरक काय मास्क लावणार?, असं म्हणत अजित पवार यांनी सभागृहामध्ये मास्क न लावणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार सभागृहामध्ये मास्क न वापरण्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

काल मी एवढं सांगितल तरीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मास्क लावत नाहीत, गणेश नाईक (Ganesh Naik) मास्क लावत नाहीत. मी नाईकसाहेबांच्या वयाचा विचार करुन विनंती करतो. आपले संबंध कसे आहेत हे तुम्हाला माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले. ‘नवाबभाईंचं तर काय… नवाब भाई (Nawab Malik) आजकाल कुठलं बोलताना आमचं ऐकतच नाहीत. आता करायचं काय?’, असं अजित पवार विधानसभेत म्हणाताच सभागृहात हशा पिकला. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे आपण सगळे त्याकडे गांभीर्याने पाहूया, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कोरोना परिस्थितीवर खूप गांभिर्याने विचार करत आहेत. पण त्यामुळे रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. काही ठराविक लोक सोडली तर कोणीही सभागृहात मास्क लावत नाही, असं म्हणत अजित पवारांनी सभागृहामध्ये मास्क लावण्यास सर्वांना सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!