🕒 1 min read
मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य विधीमंडळ अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली. विधानसभेत बोलताना एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवारांनाही सुनावले आहे.
ज्या संघटनेने संपाची हाक दिली त्यांनीच संप मागे घेतला आहे, तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणावर कायम आहेत, त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा आपल्या डोक्यातून काढून टाकावा, असं आवाहनही अजित पवारांनी केले आहे.
परत सत्ता मिळेल हेही तुम्ही डोक्यातून काढून टाका, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालयाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या स्पष्ट निवेदनाने सरकारची एसटी कामगाराच्या महत्वाच्या मागणी संदर्भातील भूमिका स्पष्ट झाली आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही अजित पवारांनी सभागृहाला दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक! औरंगाबादेत 2 ओमायक्रोन पॉझिटिव्ह, तर 40 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा
- “नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली”
- “सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

