Share

विधानसभेत काय झोपा काढता का?; अजित पवार कडाडले

Published On: 

मुंबई : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. भर सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत काल मास्क न लावणाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि पुन्हा एकदा त्यांचे सडेतोड बोलणं पाहायला मिळालं आहे.

विधानसभेत एवढा स्फाट काय करतो? विधानसभेत ‘झोपा काढता का रे? असा रोखठोक सवाल विचारल्याने काही काळ वातावरण पुन्हा तापल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभागृहाची प्रश्नपत्रिका न मिळाल्याने सदस्य भडकले आहेत. यावेळी अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.

अजित पवारांना आपण अनेकदा बेधडक बोलताना बघितले आहे. अजित पवार भर सभेत विरोधकांना थेट आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जातात. इतकेच काय अजित पवार त्यांच्याच सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही अनेकदा शाळा घेतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे, याच अजित पवारांचे हे आक्रमक रुप आज पुन्हा सभागृहाने पाहिले आहे.

विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’ प्रत्येक दारामध्ये तुम्ही लोक उभे करता, त्यावेळी आत आमदार आल्यानंतर त्यांच्या हातात गठ्ठा द्या, काम होऊन जाईल, असे म्हणत अजित पवारांनी सभागृहातील कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. सदस्यांच्या वेदना बरोबर आहेत, त्याचे काय चुकीचे आहे? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पुढील कामकाजाबाबतही अजित पवारांनी काही बदल सुचवले, त्याला नरहरी झिरवळ यांनीही संमती दर्शवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!