Share

“सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन वर्ष वेतन न मिळाल्याने मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी महापालिकेने प्रशासकीय अधिकाऱ्यासह एकूण ३ जणांना निलंबित केले आहे. यावर भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी महापालिका प्रशासनासह शिवसेनेवर टीका केली आहे. आता तीन जणांचे निलंबन करुन काय फायदा? असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

याबाबत आ. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘मुंबई महापालिकेतल्या एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला तब्बल २ वर्षे वेतन मिळत नसेल यावर कसा विश्वास ठेवायचा? २७ वर्षाच्या या दुर्देवी सफाई कामगाराने शेवटी विष पिऊन आत्महत्या केली. आता ३ जणांचे निलंबन करून काय फायदा? टक्केवारी घ्या पण पगार द्या, अशी अवस्था मनपा कर्मचाऱ्यांवर आली आहे’. अशी टीका आ. भातखळकरांनी केली आहे.

रमेश परमार (वय २७) असे आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर रमेश परमार यास महापालिकेने सेवेत समावून घेतले होते. सफाई कामगार म्हणून पालिकेच्या पी दक्षित प्रभगात त्याची नियुक्ती करण्यात आली. त्याच्या कागदपत्रावर ऑगस्ट २०२० मध्ये महापालिकेच्या लेखा अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यावर परमार याने कागदपत्रांची पूर्तता केली नाही. असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या नैराश्‍यातून रमेश परमार याने २२ डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा २३ डिसेंबरला मृत्यू झाला. महापालिकेने केलेल्या प्राथमिक चौकशीत पी-दक्षिण विभागाच्या घनकचरा विभागाचे पगारीबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!