मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पक्षातील असो किंवा मग विरोधी पक्षातील कोणी चुकीत सापडला की, त्याला खडेबोल सुनावल्याशिवाय अजित पवार काही गप्प राहत नाहीत. आजही अजित पवारांनी भर सभागृहामध्ये मास्क न लावणाऱ्या नेत्या मंत्र्यांना चांगलेच खडासावले आहे.
अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आपण दोन्ही बाजूचे लोक 4-5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कोरोना परिस्थितीवर खूप गांभिर्याने विचार करत आहेत. पण त्यामुळे रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. काही ठराविक लोक सोडली तर कोणीही सभागृहात मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथं काय सुरु आहे ते पाहत आहे. आम्हीच मास्क लावत नसू तर नागिरक काय मास्क लावणार?, असं म्हणत अजित पवार यांनी सभागृहामध्ये मास्क न लावणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
ठिक आहे काहींना मास्क लावसल्यावर बोलता येत नाही. म्हणून बोलताना मास्क काढतात. ते आपण समजून घेतो पण बोलून झाल्यानंतरही ते मास्क लावत नाहीत. मी तर बोलताना पण मास्क लावतो काहींची अडचण असते, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
कोणाला याची कल्पना नाही पण परदेशात दीड दिवसाला या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही गोष्टींचे ज्या त्या वेळीच गांभिर्याने घेऊन आपण त्या जागी असताना माझ्या सारख्याने जरी मास्क लावला नसेल तरी मलाही लगेच बाहेर काढा. पण कुठेतरी गांभर्याने वागा, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं?; फडणवीसांचा मलिकांना टोला
- त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक


