Share

ठाकरे सरकारचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात तुफान खडाजंगी पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनात विरोधी आणि सत्त्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पहायला मिळाली. अनेक मुद्द्यांवर वाद झाले आहेत. त्यात विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याचा नियम बदल करण्याचा मुद्दाही होता. यावर विरोधीपक्ष भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत नियम समितीने एक शिफारस केली आहे. ज्या प्रमाणे आपल्या देशात खुल्या मतदान पद्धतीने सर्व विषय हताळले जातात. अध्यक्षाची निवड व्हावी. यासाठी शिफारस सभागृहाकडे दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर बोलताना ठाकरे सरकारला टोमणा मारला आहे.

ज्या सरकारकडे 170 चे बहुमत सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमतावर विश्वास का नाही? महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही. ठाकरे सरकारचा स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच पाहिले नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टहास का? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!