Share

दक्षिण आफ्रिका क्रिकेटनं नेमला नवा संचालक..! ग्रॅमी स्मिथची घेणार जागा

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. ग्रॅमी स्मिथच्या जागी एनोक एनक्वे यांची क्रिकेटचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ मध्ये स्मिथच्या आगमनापूर्वी, एन्क्वे यांनी हंगामी संचालक म्हणून काम केले आणि स्मिथने पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना राष्ट्रीय संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. ग्रॅमी स्मिथने २०१९ ते मार्च २०२२ पर्यंत या पदावर काम केले आहे.

स्मिथने २०१९च्या उत्तरार्धात या पदावर काम सुरू केले आणि नंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांचा करार दोन वर्षांसाठी वाढविण्यात आला. मार्च २०२२ मध्ये त्याच्या कराराची मुदत संपल्यानंतर स्मिथने पद सोडले आणि तेव्हापासून हे पद रिक्त आहे. यादरम्यान, वर्णभेद प्रकरणात स्मिथचे नाव देखील समोर आले, परंतु नंतर पुराव्याअभावी त्याला सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले.

एनक्वे यांनी लायन्स आणि गौतेंगसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे, परंतु त्यांनी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४२ प्रथम श्रेणी, ३८ लिस्ट-ए आणि नऊ टी-२० सामने खेळले आहेत. या अष्टपैलू खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७६८ धावा करत २९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत तीन शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. लिस्ट-ए मध्ये त्यांनी ४७१ धावा केल्या आणि २५ विकेट्स घेतल्या. टी-२० मध्ये त्यांच्या नावावर ३६ धावा आणि ४ विकेट आहेत.

२०१६ मध्ये, एनक्वे नेदरलँड संघात सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही सामील झाले. २०१८ मध्ये ते हायवेल्ड लायन्समध्ये सामील झाले आणि पहिल्या सत्रात CSA टी-२० चॅलेंज आणि प्रथम श्रेणी स्पर्धा जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!