मुंबई : जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले.
या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे स्पष्ट केले आहे. अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांनी दगा दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरलं होतं असं ठाकरे म्हणाले.
याबद्दल अमित शहांनी मला वचन देखील दिल होत. पण त्यांनी त्यांचा शब्द मोडला. ठरल्याप्रमाणे केलं असत तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असत. पण अमित शहा यांनी दगा दिला असल्याच उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आज अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केला. आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला तो मुंबईच्या काळजात नको असे भावनिक आवाहन देखील ठाकरेंनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

