मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आलेला आहे. आज इंग्लंड आणि भारत यांच्यात पूर्वनियोजित एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर पहिल्यांदा फलंदाजी करणे नेहमीच आव्हानात्मक राहिलेले आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी खेळायला गेलेल्या कसोटी मालिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. या मालिकेत भारत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड संघ मालिका बरोबरीत सोडण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे हा सामना अनिरणीत किंवा विजय मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवलेले आहे. तर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे दिली आहे. या अगोदर साउथ आफ्रिका विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेपूर्वी भारताचा सलामीचा फलंदाज के एल राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे राहुलचा इंग्लंड दौऱ्यासाठी समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे माजी कर्णधार विराट कोहली वर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. या सामन्यात विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसे पाहिले तर इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या बॅटने चांगली कामगिरी केलेली आहे.
England have won the toss and elect to bowl first in the 5th Test.
Live – https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/HtE6IhjcHq
— BCCI (@BCCI) July 1, 2022
दोन्ही देशांचे कसोटी संघ
भारत – शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार)
इंग्लंड – अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

