Share

पाकिस्तानचा बाबर आझम गोलंदाजीतही हुशार..! फिरकी गोलंदाजी करत घेतल्या ‘इतक्या’ विकेट्स

Published On: 

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने संपूर्ण जगात आपल्या फलंदाजीची गुणवत्ता सिद्ध केली आहे. तो सतत अनेक विक्रम मोडत आहे आणि खूप धावा करत आहे. मात्र, फलंदाजीनंतर त्याने गोलंदाजीतही आपली चुणूक दाखवली आणि फिरकीपटू म्हणून विकेट्स घेतल्या. बाबर आझमने नुकत्याच रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात दोन बळी घेतले आणि उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी केली.

बाबर आझमने मोहम्मद नवाजच्या रूपाने पहिली विकेट घेतली. त्याने नवाजला पॉईंटवर झेलबाद केले. यानंतर त्याचा दुसरा बळी हा वेगवान गोलंदाज हसन अली ठरला, ज्याला तो लेग बिफोर आऊट झाला. बाबर आझमने एकूण ९ षटके टाकली आणि यादरम्यान त्याने ३४ धावा देत २ बळी घेतले. या सामन्यात बाबर आझमने एका संघाचे नेतृत्व केले तर सरफराज अहमदने दुसऱ्या संघाचे नेतृत्व केले.

बाबर आझमने नुकताच एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत बाबर आझम टी-२० मध्ये नंबर एक फलंदाज आहे. यासह, बाबरने आता सर्वात जास्त काळ टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. गेल्या १०३० दिवसांपासून तो अव्वल स्थानावर आहे. याआधी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, जो गेल्या दशकात १०१३ दिवस अव्वल स्थानावर राहिला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!