सोलापूर : सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यासोबत एक अजब प्रकार घडला. सांगोला तालुक्यातील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी “आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा”, असे म्हणत सदाभाऊंच्या गाडीचा ताफा अडवला. सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. आता यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सदाभाऊ खोत आज सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहा सुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे. असं काहीतरी कुभांड रचायच आणि त्यानंतर हल्ला करायचा असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्याचं टायमिंग चुकले आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुबांड रचुन एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते ते लवकर येत नव्हते, त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ती पुन्हा पुन्हा सांगत होता. म्हणून हा हल्ला का झाला तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला, असे त्यांना चित्र महाराष्ट्रभर घालवायचं होतं”.
ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अवस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालं. ह्या प्रकरणात जिल्हयातील राष्ट्रवादीच्या टमाटू सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच मिडिया समोर वाचला. तसेच राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“तुम्ही असे हल्ले करून आणि कुभांड रचून आम्हाला जीवनातून उठवू शकत नाही. हा संघर्ष आता तीव्र होईल आणि गावगाड्यातील माणसांना एकत्र घेऊन ह्याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गुन्हेगारांना पुढे घालून जर हल्ला कराल तर सदाभाऊ खोत त्याच्या बापांचा बाप आहे. भविष्यात ‘आरे ला कारे’ म्हणूनच उत्तर दिले जाईल, असेही म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


