मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर (ENG vs IND) चांगली सुरुवात करूनही भारतीय संघ कसोटी सामना जिंकू शकला नाही. कदाचित याच कारणामुळे भारतीय चाहते पराभवापेक्षा अधिक निराश झाले होते. पण या पराभवाचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेची सुरुवात ७ जुलैला टी-२० सामन्याने होणार आहे.
या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेद्वारे रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. रोहित तब्बल ११२ दिवसांनी भारताकडून सामना खेळणार आहे. १४ मार्च रोजी त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत ६ सामने होणार आहेत. हे सामने ७ जुलै ते १७ जुलै दरम्यान खेळवले जातील. म्हणजेच पुढील ११ दिवसांत दोन्ही संघांमध्ये ६ सामने होतील. पहिला टी-२० सामना साउथम्प्टन येथे खेळवला जाईल. हा दिवस-रात्र सामना असेल, जो रात्री साडेदहा वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
टी-२० मालिकेतील दुसरा सामना ९ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार) खेळला जाईल. तिसरा टी-२० सामना १० जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. हा सामना देखील संध्याकाळी ७ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार) होणार आहे.
यानंतर, दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत दोन हात करतील. एकदिवसीय मालिकेतील सामने १२, १४ आणि १७ जुलै रोजी होणार आहेत. पहिले दोन एकदिवसीय सामने दिवस-रात्र असतील, संध्याकाळी साडेपाच वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होतील. तिसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजल्यापासून खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

