मुंबई : राज्यातील सत्तानाट्याचा शेवट होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या संदर्भातील काही फोटो व्हायरल देखील झाले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी अशी कुठलीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकार केल्या असल्याच्या बातम्या दाखवण्यात येत होत्या. मात्र अशी कुठलीही भेट झाली नसल्याचं त्यांनी ट्विट च्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये” असे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये…..#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मध्यरात्री भेट झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या बातमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या दरम्यानचे हे फोटो असल्याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी ट्विट च्या माध्यमातून केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

