Share

Eknath Shinde on Uddhav Thackeray : “दाऊद इब्राहिमबाबत निर्णय न घेतल्याने…” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालिकास आघाडीवर सडकून टीका केली. ५० आमदारांनी शिवसेना सोडली तर त्यामागे मोठे कारण काय आहे, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट, वीर सावरकर आणि हिंदुत्वाशी संबंधित प्रकरणांमध्ये उद्धव ठाकरे सरकार निर्णय घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ५० आमदारांनी शिवसेनेची साथ सोडली. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्व विचारधारा, त्यांची भूमिका पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ५० आमदारांनी असे पाऊल उचलले तर त्यामागे आणखी मोठे कारण असावे. क्षुल्लक कारणासाठी इतका मोठा निर्णय कोणी घेत नाही. असा निर्णय एक नगरसेवकही घेत नाही. ५० आमदारांनी असा निर्णय का घेतला? याचा विचार करण्याची गरज होती.

“शिवसेना-भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या पण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे जेव्हा-जेव्हा हिंदुत्वाचे मुद्दे समोर आले, सावरकरांशी संबंधित प्रकरणे समोर आली, मुंबई बॉम्बस्फोटाचा मुद्दा आला, दाऊदचा मुद्दा आला आणि त्यासंबंधीचे इतर मुद्दे समोर आले, तेव्हा उद्धव ठाकरे यांना निर्णय घेता आला नाहीत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!