Share

ENG vs IND : ‘‘इंग्रजांना स्वत: च्या फायद्यासाठी…”, भडकलेल्या अमित मिश्रानं इंग्लंडच्या बार्मी-आर्मीला का सुनावलं?

Published On: 

मुंबई : भारताचा महान फिरकी गोलंदाज अमित मिश्राने इंग्लंड क्रिकेट संघाच्या सपोर्ट क्लब बार्मी-आर्मीवर निशाणा साधला आहे. एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवानंतर (ENG vs IND) बार्मी-आर्मीने इंग्लंडला १-०ने मालिका विजयी घोषित केले. यावर अमित मिश्राने त्याला सडेतोड उत्तर देत इंग्लंडला नेहमीच इतिहासाशी छेडछाड करण्याची सवय असल्याचे सांगितले.

एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ७ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी अवघ्या ३ गडी गमावून पूर्ण केले. जो रूट १४२ आणि जॉनी बेअरस्टो ११४ धावा करून नाबाद राहिले. या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. यासह भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आणि त्यांना २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.

या मालिकेतील पहिले ४ सामने गेल्या वर्षीच झाले होते आणि कोरोना व्हायरसमुळे पाचवा सामना होऊ शकला नाही. त्याच वेळी, जेव्हा हा सामना झाला तेव्हा इंग्लंडने विजय मिळवला आणि बर्मी-आर्मीने त्यांना १-०ने मालिका विजयी घोषित केले. यावर अमित मिश्रा खूश नाराज झाला. त्याने इंग्लंडवर इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला. तो म्हणाला, ”इंग्रजांना स्वतःच्या फायद्यासाठी इतिहासात फेरफार करण्याची सवय आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!