Share

ENG vs IND : ‘‘अत्यंत निराशाजनक कामगिरी…”, भारताच्या पराभवानंतर रवी शास्त्रींनी ‘यांना’ धरलं जबाबदार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात (ENG vs IND) भारतीय संघाच्या पराभवावर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवासाठी त्याने फलंदाजांना जबाबदार धरले आणि सांगितले की, खेळाच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजी चांगली झाली नाही.

गेल्या वर्षी भारताने रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा दौरा केला तेव्हा संघाने चारपैकी दोन सामने जिंकले होते. त्यांना एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर एक सामना अनिर्णित राहिला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया २-१ ने आघाडीवर असून त्यांना मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, मँचेस्टरमध्ये होणारा पाचवा कसोटी सामना कोरोना व्हायरसमुळे होऊ शकला नाही. तो सामना आता बर्मिंगहॅममध्ये झाला होता, जो जिंकून इंग्लंडने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

भारताला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती पण त्यांना ती करता आली नाही. मागच्या वेळी प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री यावेळी समालोचन करत होते. स्काय स्पोर्ट्सवरील संभाषणात ते म्हणाले, ”माझ्या मते ही अत्यंत निराशाजनक कामगिरी होती, कारण भारतीय संघ इंग्लंडला सामन्यातून बाहेर काढू शकला असता. त्यांना फक्त दोन सत्रांसाठी फलंदाजी करायची होती आणि मला वाटते की संघाने बचावात्मक दृष्टीकोन घेतला. तो बऱ्यापैकी बांधलेला दिसत होता, विशेषतः दुपारच्या जेवणानंतर. संघाला हवे असते तर विकेट पडल्यानंतर संधी घेता आली असती. कारण त्यावेळी धावांचे महत्त्व खूप होते. संघाने लवकर विकेट गमावल्या, त्यामुळे चौथ्या दिवशी इंग्लंडला फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!