Share

“हे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण” ; रुपाली चाकणकरांची भाजपवर टीका, आदित्य ठाकरेंनाही केला सवाल

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नवा वाद निर्माण झाला आहे. देहू, पुणे येथील मंदिराच्या उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, रुपाली चाकणकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंदिराच्या उद्घाटन समारंभात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बोलू दिले गेले नाही.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला तसचे राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या पुणे मनपाच्या कार्यक्रमात साहेबांना निमंत्रण नसणे आणि आज देहू येथील कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार बोलू न देणे, हे भाजपच्या संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे.”

आदित्य ठाकरेंना सवाल करत चाकणकर म्हणाल्या, “राज्य अथवा केंद्र सरकारमध्ये अति महत्वाच्या व्यक्तींना दिला जाणारा मान यासाठी राज शिष्टाचार नावाचं खाते आपल्याकडे आहे. त्या राजशिष्टाचारांच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम भाजप सरकार वेळोवेळी करत आले आहे. ”

हा महाराष्ट्राचा अपमान –

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ही गंभीर बाब आहे. हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि प्रोटोकॉल अंतर्गतच दिल्लीतील कार्यालयात भाषणासाठी पत्र लिहिले, परंतु प्रतिसाद आला नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपचे स्पष्टीकरण-

देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नकता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खासगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली पण त्यांनी नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील राजभवन येथील एकच कार्यक्रम सरकारी होता, तेथे प्रोटोकॉलपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण झाले. (येथे श्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही. हे लक्षात घ्या) असे भाजपने म्हटले आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपकडून कोणताही आक्रस्ताळेपणा झालेला नाही. कारण, भाजपसाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राच द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत स्वतःचा अहंकार नाही. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे त्यामुळे त्यांना औषध नाही, असा टोलाही भाजपने लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!