Share

देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र, पत्रातील १० ठळक मुद्दे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. केंद्राने याबाबतीत कठोर पावले उचलावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना लिहिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ले झाले. फडणवीस यांनी या सर्व बाबी केंद्रातील वरिष्ठांना पत्रातून कळवले आहे. आता केंद्र सरकार याबाबतीत कोणती पावले उचलणार हे पाहणं महत्त्वपूर्ण आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातील १० मुद्दे :

  • राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला
  • पोलिसांच्या संरक्षणात सोमय्यांवर झालेला हल्ला
  • सोमय्यांवर फेकलेली चप्पल, बाटल्या
  • दगडफेकीत फुटलेली गाडीची काच, जखमी झालेले सोमय्या
  • पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला
  • राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न
  • झेड सुरक्षा असताना झालेला हल्ला
  • मुंबई पोलीस महाविकास आघाडीची नोकर असल्या सारखी वागतेय
  • राजकीय दबावामुळे हल्लेखारांवर मुंबई पोलिसांची कारवाई नाही
  • कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कडक पावले उचलावीत    

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!