Share

“जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही तोपर्यंत…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठन करणार असा इशारा राणा दाम्पत्यानी दिला होता. त्यामुळे मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला होता. या प्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची जीभ घसरली. यावरूनच त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.

“कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं..पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो? तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरण्याऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते. अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

मुंबईला अशांत करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राणा दाम्पत्यानी केले आहे. तुम्हाला जिथे म्हणायची आहे तिथे हनुमान चालिसा म्हणा. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचायला ते काय तुमच्या बापाचे*** आहेत काय? असे काही नी*** आणि ह***  लोक भारतात आहेत. असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. ते चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या आरोग्य शिबिरात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!