मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या वादावर तोडगा निघावा आणि भोंग्याच्या मुद्द्यावर एक सर्वसमावेशक धोरण असावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिले आहेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांनी ही बैठकीला दांडी मारली आहे. भोंग्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
भोंग्याच्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय त्यामुळे चर्चातून तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकाने सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतला. आता या बैठकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे आता विरोधी पक्षांना आणि विशेषतः मनसे आणि राज ठाकरे यांना भोंग्याच्या वादावर सर्वसमावेशक तोडगा नको आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. भोंग्याच्या वादावर तोडगा काढून हा वाद सर्वसमावेशकतेने सोडवण्याची मानसिकता विरोधी पक्षाची आणि विरोधी पक्षातल्या नेत्याची नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

