🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेने भाजपशी गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसला होता. जनतेने सत्तेत बसण्यासाठी भाजपाला निवडून दिलं होतं. मात्र शिवसेनेने धोका दिल्यामुळे भाजप पक्षाला सत्य बाहेर बसावे लागले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-भाजपचे नवे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर मध्ये गेले. तेथील कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व रॅली ही काढण्यात आली. या रॅलीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की,’ हा तुम्ही दिलेला कौल आहे. यासाठीच तुम्ही अडीच वर्ष अगोदर भाजपला निवडले होते. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा शिवसेना-भाजप सरकार आले आहे. एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या स्वागताचा आवाज ठाणे आणि मुंबईपर्यंत ऐकायला गेला पाहिजे.’ असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडीच्या खराब कारभारामुळे वाईट वाटायचे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक वाईट गोष्टी घडल्या. या मागील अडीच वर्षात राज्यात भ्रष्टाचार, अनाचार, दूराचार अशा अनेक समस्या ही पाहायला मिळतं होत्या. सामान्य माणसांचे कोणी ऐकत नव्हते. त्यामुळे आपण शिवरायांचे वंशज आहोत. छत्रपतींनी जो गनिमी कावा सांगितला त्याच गनिमी काव्याने पण निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. रोज मला वाईट वाटायचे. संताप व्हायचा, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
शेवटी पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी सर्वतोपरी
सरकार बनवेल पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी माझे नाव अनाऊन्स केले. जेपी नड्डा आणि शहा बोलले. पंतप्रधान मोदींशी बोलल्यावर मी सहभागी झालो. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मोदी शहा नसते तर नागपूरचा माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता, असे ते म्हणाले. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. त्यांनी सांगितले भाजपाच्या संपूर्ण १०६ लोकांचं नेतृत्व तू करत आहेस, तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घे आणि मी जबाबदारी स्वीकारली, असे फडणवीस नागपुरात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
