मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रोहित भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून तो आयसोलेशनमध्ये होता. पण, आता तो कोरोनामधून बरा झाला आहे.
रोहित शर्माच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा ऑफस्पिनर आर अश्विनच्या चेंडूवर सराव करताना दिसत आहे. रोहितची देहबोली पाहता तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून गोलंदाजांचा समाचार घेण्यास सज्ज झाला आहे. कोरोनामुळे रोहित टी-२० मालिकेपूर्वी काऊंटी संघांविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सराव सामन्यांमध्येही भाग घेऊ शकला नाही.
.@ImRo45 – out and about in the nets! ???? ????
Gearing up for some white-ball cricket. ???? ????#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/nogTRPhr9a
— BCCI (@BCCI) July 4, 2022
दुसऱ्या सराव सामन्यात भारताने नॉर्थम्प्टनशायरचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात १४९ धावा केल्या. यानंतर नॉर्थम्प्टनशायरचा डाव १३९ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात हर्षलने २ बळीही घेतले.
पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बी. , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

