🕒 1 min read
मुंबई : पैठणचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांनी बंडखोर आमदारांचे सुरतच्या प्रवासातले किस्से सांगितले आहेत. बंडखोर आमदार आणि मंत्री एकाएकी उठून बंडात सामिल झाले नाहीत. तर ही नाराजी अनेक दिवसांपासूनची असल्याचं संदीपान भुमरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल गेल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
विधान परिषदेच्या निकालानंतर सूरतपर्यंत आमदार कसे पोहोचले याचा प्रवास संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला. राज्य सरकारच्या पोलिसांनी नाकेबंदी केली होती. ठाणे सोडताना पोलिसांनी अडवलं होतं. मात्र एकनाथ शिंदेंचा एक फोन गेला आणि बघता बघता नाकेबंदी आपोआप बाजूला सारली गेली असल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला. शिंदे यांच्या शब्दातच एवढा दम असल्याच भुमरे यावेळी म्हणाले.
विधान परिषदेच्या निकालानंतर या बंडाला सुरुवात कशी झाली याबद्दल त्यांनी संवाद साधला. हा बंड नसून उठाव असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही अनेक वेळा उद्धव साहेबांना कल्पना दिली होती. शिंदे साहेबांनाही कल्पना दिली होती. काम होत नव्हती. आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल गेलं. देशात हे पहिल्यांदा घडलंय. सत्ताधारी हे फुटत नसतात. पण आम्हीच उठाव केला असल्याचं भुमरे यांनी यावेळी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा संवाद होऊन दिलं जात नव्हतं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही फोन लावायचो पण त्यांना तो फोन दिला जात नव्हता. उद्धव साहेबांना चार जणांच्या विळख्याबाहेर जाऊन देत नव्हते असंही भुमरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना भाजपने काही ऑफर दिली होती का? अस विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले , सगळ्यांनाच मंत्रिपद मिळत नाही. कॅबिनेट मंत्री तर मी, दादा भुसे, गुलाबराव पाटील आहोत. यापेक्षा कुठलीही अपेक्षा ठेवली नसल्याचं त्यांनी सांगितल.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
