मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रसाद ओक त्याच्या आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी कायम चर्चेत राहिला. त्याचबरोबर या चित्रपटातील क्षितिज दाते हा अभिनेता देखील चर्चेत राहिला. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिजने साकारली आहे.
चित्रपटातील ही भूमिका साकारणे वाटतं तेवढं क्षितिज साठी सोपं नव्हतं. पण चित्रपटासाठी त्याला एकनाथ शिंदे यांची उत्तम साथ मिळाली त्यामुळे त्याने त्याची भूमिका खूप उत्कृष्ट पद्धतीने साकारली. एका मुलाखतीमध्ये क्षितिजने चित्रपटदारम्यानचे काही अनुभव सांगितले आहेत.
https://www.instagram.com/tv/CflufymIL7l/?igshid=YmMyMTA2M2Y=
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत क्षितिजला प्रश्न विचारतात क्षितिज म्हणाला, “एकनाथ शिंदे सरांच्या घरी आम्ही एक सीन शूट केला. अर्थात त्यांचं घरामध्ये एक ऑफिस आहे. शिवाय घरी लोकांची वर्दळ असते. माझा सेटवरच मेकअप केला आणि इनोव्हामधून त्यांच्या घरी नेलं. खरंच मी थट्टा करत नाही. पण सेटपासून त्यांच्या घरी जाईपर्यंत ठाण्यामध्ये काही ठिकाणी वाहतूक कोंडी होती. यादरम्यान लोकांनी मला एकनाथ शिंदे यांच्या लूकमध्ये गाडीच्या काचेमधून पाहिलं. माझी प्रतिमा धूसर दिसत होती. लोक मला एकनाथ शिंदे आहेत हे समजून अक्षरशः हात जोडून नमस्कार करत होते. यामधूनच एकनाश शिंदे यांची पावर काय आहे ते समजलं.”
महत्वाच्या बातम्या :


